CoronaVirus News: सरकार आमच्या मरणाची वाट बघतंय का?; रेमडेसिविर मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 09:01 AM2021-04-15T09:01:00+5:302021-04-15T09:05:56+5:30
relatives of corona patients agitated after not getting remdesivir injection: रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्यानं कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
पुणे: पुण्यातील कोरोनाबााधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्याला रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. नातेवाईकांनी बंडगार्डन चौक अडवला असून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. रेमडेसिविर मिळत नसल्यानं नातेवाईक हतबल झाले असून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. (in pune relatives of corona patients agitated after not getting remdesivir injection)
कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यावर किती वेळात होते लागण?; वाचून धक्का बसेल
सरकार, प्रशासनाकडून रेमडेसिविरचा पुरवठा होत असल्यानं रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आज सकाळी बंडगार्डन चौकात ठिय्या दिला. काळ्या बाजारात इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार यापैकी अनेकांनी केली. नातेवाईकाला इंजेक्शन नाही तर मृत्यूचा दाखला घ्यायचा का?, असा सवाल आंदोलन करत असलेल्या गीता गोयल यांनी उपस्थित केला. गीता यांचे पती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमच्यासमोर इतरांना इंजेक्शन देतात. पण आम्हाला देत नाहीत. मी गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे फिरतेय. पण इंजेक्शन मिळालेलं नाही. सरकार आमच्या मृत्यूची वाट बघतंय का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
बुधवारी संध्याकाळपर्यंत रेमडेसिविरचा पुरवठा नाही
राज्याच्या तुलनेत गेले दोन दिवस पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा ब-यापैकी पुरवठा होत असताना बुधवारी सायंकाळपर्यंत मात्र पुण्यासाठी एकही रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा झाला नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी होत असल्याने व अनेक हॉस्पिटलकडून तुमच्या पेशंटला दोन तासात रेमडेसिविर उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही जबाबदारी घेणार नाही असे वारंवार सांगितले जात असल्याने बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागली.
...तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंती
पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार,मंगळवार या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. परंतु दररोज रुग्णसंख्या वाढतच असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीदेखील वाढतच आहे. सध्या अनेक खाजगी हॉस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अधिक केला जात असून यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.
हॉस्पिटलकडून पेशंटच्या जिवाशी खेळ
कोरोनामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पण रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. काही करून दोन तरी रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्या, अन्यथा तुमच्या पेशंटची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे सांगून सध्या काही हॉस्पिटल पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच काही हॉस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस दिला जात असल्याचे भरारी पथकातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.