तिरंग्याची प्रतिकृती साकारत 'प्रजासत्ताक दिन' साजरा,गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 02:23 PM2019-01-26T14:23:51+5:302019-01-26T14:24:10+5:30
तब्बल साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशाच्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची प्रतिकृती साकारत प्रजासत्ताक दिन साजरा केला.
पुणे - तब्बल साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशाच्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची प्रतिकृती साकारत प्रजासत्ताक दिन साजरा केला. पुण्यामधील नऱ्हे येथील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये या प्रतिकृती साकारण्यात आल्या.
उतुंग हिमालयाच्या बर्फाळ शिखरातही शत्रूंचा मुकाबला करत भारतमातेच्या रक्षणार्थ प्राणाची बाजी लावून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणारे आणि सामाजिक-भावनिक बांधिलकी जपणारे मेजर शशिधरण नायर पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना धुडकावून लावताना भूसुरुंग स्फोटात शहीद झाले. भारतमातेच्या या सुपुत्रास झील एज्युकेशन सोसायटीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वीरमाता लता, वीरपत्नी तृप्ती आणि वीर भगिनी सीना यावेळी उपस्थित होत्या.
या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. या अमेरिकेतील संस्थेने "लार्जेस्ट हुमन डिपिशन पर्सोनेज इन्ग्रॅव्हिन्ग" या अंतर्गत नोंद करून प्रमाणपत्रही दिले आहे.