Pune : उकाड्याने पुणेकर झाले हैराण; शहरातील तापमानाचा पारा उच्चांकी

By श्रीकिशन काळे | Published: May 20, 2023 04:37 PM2023-05-20T16:37:25+5:302023-05-20T16:40:34+5:30

तापमानाचा पारा आणखी दोन-तीन दिवस वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे...

Pune residents are shocked by the heat; Mercury highs in city temperature | Pune : उकाड्याने पुणेकर झाले हैराण; शहरातील तापमानाचा पारा उच्चांकी

Pune : उकाड्याने पुणेकर झाले हैराण; शहरातील तापमानाचा पारा उच्चांकी

googlenewsNext

पुणे : शहरातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून, त्यामुळे पुणेकर घामाने हैराण झाले आहेत. घराबाहेर पडल्यानंतर गरम झळ्या अंगाला झोंबत आहेत. त्यामुळे नागरिक घरातच राहण्याचे पसंत करत आहेत. हा पारा आणखी दोन-तीन दिवस वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

दोन दिवसांपासून पुण्यात तापमानाने आपला पारा पुन्हा वर चढवला आहे. परिणामी प्रचंड उकाडा जाणवत आहे. आज पुण्यातील अनेक ठिकाणांचे तापमान चाळीशीपार नोंदवले गेले. किमान तापमानातही वाढ झालेली दिसून येत आहे. घराबाहेर जाणे पुणेकरांच्या जीवावर येत असल्याचे पहायला मिळत आहे. येत्या बुधवार (दि.२४)पासून दुपारी उष्णता आणि सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, शनिवारी लोहगावात आणि मगरपट्टा येथे ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शहरातील कमाल तापमान
लोहगाव ४०.०
मगरपट्टा ४०.०
पाषाण ३९.०
चिंचवड ४०. ०
लवळे ४१.०

Web Title: Pune residents are shocked by the heat; Mercury highs in city temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.