‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकरांना फुटतोय घाम; गेल्या २ दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता

By श्रीकिशन काळे | Published: October 5, 2023 03:47 PM2023-10-05T15:47:42+5:302023-10-05T15:47:57+5:30

मुंबई आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सून परतीच्या वाटेवर जाईल

Pune residents are sweating because of October Hit Heat in the air during the day and night for the last 2 days | ‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकरांना फुटतोय घाम; गेल्या २ दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता

‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकरांना फुटतोय घाम; गेल्या २ दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता

googlenewsNext

पुणे : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशातील काही भागातून तो परतला आहे. महाराष्ट्रातून देखील तो परतीच्या वाटेवर असून, पुणे शहरात ऑक्टोबर हिट पुणेकरांना जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने आता पुणेकर हैराण होऊ लागले आहेत. 

देशातील उत्तरेच्या काही भागातून मॉन्सून पूर्णपणे परतला आहे. तो हळूहळू महाराष्ट्रातूनही जाईल. मुंबई आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सून परतीच्या वाटेवर जाईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार आहे. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना घाम फुटत आहे. शहरात सर्वाधिक तापमानाचा पारा मगरपट्टा येथे ३४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. आज (दि.५) शहरातील आकाश दुपारी निरभ्र आणि सायंकाळी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (दि.६) मात्र  शहरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  

शहरातील दुपारचे तापमान

मगरपट्टा : ३४.१
शिवाजीनगर : ३१.८
पाषाण : ३१.८
लोहगाव : ३२.२
चिंचवड : ३३.२

Web Title: Pune residents are sweating because of October Hit Heat in the air during the day and night for the last 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.