पुणेकरांनो सावधान!'या' रस्त्यांवर आज सायंकाळ ते उद्या पहाटेपर्यंत असणार'नो व्हेईकल झोन'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 03:30 PM2020-12-31T15:30:06+5:302020-12-31T15:36:55+5:30
पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रचंड गर्दी असते.
पुणे : पुणेकर नेहमीच सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचं स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करतात.३१ डिसेंबरला मध्यरात्री हे सेलिब्रेशन पुण्यातील विविध रस्त्यांवर हमखास पाहायला मिळते. पण यंदा सर्व सॅन उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्वांचाच हिरमोड झाला असून पोलीस व महापालिका प्रशासनाकडून घरातल्या घरातच नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच तरीदेखील नागरिकांनि रस्त्यावर गर्दी करू नये,तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने शहरातील काही महत्वाच्या मार्गांवर वाहतुकीला 'नो एंट्री' केली आहे.
पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रचंड गर्दी असते. त्यात कॅम्प परिसरातील रस्ते, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, नदी पात्र अशा विविध रस्त्यांचा समावेश होतो. त्याच धर्तीवर पोलीस प्रशासनाकडून हे रस्ते ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी दिली आहे.
श्रीरामे म्हणाले, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. ती टाळण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजल्यापासून ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत पुण्यातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्ता या रस्त्यांवर नो व्हेईकल झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस वाहने,यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच फक्त प्रवेश दिला जाणार आहे.