येळवळीच्या आपत्तीग्रस्तांना पुणेकरांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:25+5:302021-08-17T04:16:25+5:30

लोकमतने येळवळीचा संपर्काचा एकमेव रस्ताही बंद या मथळ्याखाली दिलेली बातमी वाचून नारायणबाग सोसायटीचे संचालक, आंबी गावचे माजी सरपंच ...

Pune residents help Yelwali disaster victims | येळवळीच्या आपत्तीग्रस्तांना पुणेकरांची मदत

येळवळीच्या आपत्तीग्रस्तांना पुणेकरांची मदत

Next

लोकमतने येळवळीचा संपर्काचा एकमेव रस्ताही बंद या मथळ्याखाली दिलेली बातमी वाचून नारायणबाग सोसायटीचे संचालक, आंबी गावचे माजी सरपंच संतोष सुरगुडे, प्रा. गणेश हुरसाळे, सोमलिंग गोब्बी, चंद्रकांत सोमण, पी. सी. जाधव, मल्लेश मंगसुळी, हिरेनभाई पटेल, उद्योजक देवेंद्र किराड, सदाशिव मेहत्रे, विशाल शेलार, संपत झेंडे, संतोष दरेकर, संदीप, सोसायटीचे अध्यक्ष अशोकसिंह परदेशी व इतर सर्व सभासदांनी मदतीचा वाटा उचलत ही मदत पूरग्रस्त भागातील कोणतीही मदत न मिळालेल्या नुकसानग्रस्तांना प्रत्यक्ष पोहोचविण्यात आली.

नारायणबाग सहकारी गृहरचना संस्थेच्या वतीने महाड, पोलादपूर येथील तसेच पुणे जिल्ह्यातील वेलवळी या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना २५० किराणा मालाचे किट, १००० रुग्णांना पुरतील एवढी औषधे व जवळपास पन्नास हजार रूपये किमतीची कपडे अशा जवळपास अडीच लाख रुपये किमतीच्या वस्तूंचे नुकतेच वाटप करण्यात आले.

या भागातील सुपुत्र प्रा. गणेश हुरसाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बांधवांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्धार सोसायटीतील एकशे ऐंशी कुटुंबांनी एकत्र येत केला आहे, असे या वेळी सांगितले.

Web Title: Pune residents help Yelwali disaster victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.