पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 10:59 AM2021-07-26T10:59:13+5:302021-07-26T11:06:56+5:30

सरत्या आठवड्यात चाचण्यांची संख्या ५० हजारहूनही अधिक, मात्र पॉझिटिव्ह फक्त अठराशे

Pune residents likely to get relief from restrictions; The administration will take a decision today | पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार

पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार

googlenewsNext
ठळक मुद्देपॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा विचार सुरु कोरोनातून दिलासा, मात्र चिंता व्हायरल इन्फेक्शनचीगेल्या आठवड्याभरात इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले

पुणे : सरत्या आठवड्यात चाचण्यांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला. त्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी झाली आहे. १९ जुलै ते २५ जुलै या आठवड्यात ५३ हजार ९५३ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ८३२ कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.३९ टक्के इतका कमी झाला. त्यामुळे पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत प्रशासन आज निर्णय घेणार आहे. त्यामध्ये दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

ऑगस्टअखेर तिसरी लाट येण्याचा धोका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी निष्काळजी न होता घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे आणि तिसरी लाट येण्यापासून रोखण्यास शासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.

मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्कयांच्याही खाली गेला

पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीतही हा आठवडा अत्यंत दिलासा देणारा ठरला आहे. ७ - १४ जून या कालावधीत ४.६७ टक्के, १४ - २० जून या कालावधीत ४.८२ टक्के, २१ - २७ जून या कालावधीत ४.७० टक्के, २८ जून - ४ जुलै या कालावधीत ५.३८ टक्के, ५ ते ११ जुलै या कालावधीत ५.३७ टक्के, १२ ते १८ जुलै या कालावधीत ४.१६ टक्के हा पॉझिटिव्हिटी रेट होता. या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्कयांच्याही खाली गेला आहे. १९ ते २५ जुलैै या कालावधीत दररोजच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. आठवड्यात १८३२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले, तर १९५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ५ ते ७ इतकी कायम आहे. आठवड्याभरात ४१ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनातून दिलासा, मात्र चिंता व्हायरल इन्फेक्शनची

गेले दोन आठवडे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असताना दिसत आहे. रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या संकटातून दिलासा मिळत असताना हवामानातील बदलामुळे फ्लूसदृश लक्षणांनी मात्र डोके वर काढले आहे. आबालवृध्दांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप ही लक्षणे दिसून येत आहेत. गेल्या आठवड्याभरात इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे निरिक्षण वैैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे. पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे पदार्थ टाळावेत, ताज्या भाज्या आणि फळे खावीत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

महिन्याभरातील स्थिती :

आठवडा                 चाचण्या      रुग्ण     पॉझिटिव्हीटी रेट 

२८ जून - ४ जुलै       ३९,८८८        २१४८          ५.३८
५ - ११ जुलै              ३८,५४३        २०७२          ५.३७
१२ - १८ जुलै            ४४,६९५       १८६१          ४.१६
१९ - २५ जुलैै           ५३,९५३        १८३२          ३.३९

Web Title: Pune residents likely to get relief from restrictions; The administration will take a decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.