Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा
By राजू हिंगे | Updated: June 18, 2024 14:30 IST2024-06-18T14:29:54+5:302024-06-18T14:30:20+5:30
एकुण मिळकतधारकांपैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी ८०८ कोटी ऑनलाईन जमा केले

Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा
पुणे: पुणे महापालिकेला मिळकतकरामधून सुमारे १ हजार ३३१ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक भरणा ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. एकुण मिळकतधारकांपैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी ८०८ कोटी ऑनलाईन जमा केले आहेत.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५ टक्के आणि १० टक्के इतकी सवलत दिली जाते. नागरिकांकडून मुदतवाढ देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती.शहरात १४ लाख २२ हजार मिळकतधारक असून, त्यांना यंदाच्या आर्थिक वर्षांत मिळकतकरांची देयके पाठविण्यात आली आहेत. महापालिकेच्या नियमानुसार संपूर्ण वर्षाचे देयक मे अखेरपर्यंत भरल्यास मिळकतधारकांना मिळकतकरात पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते.
यंदा मे महिन्याच्या अखेरीस पालिकेच्या मिळकतकर भरण्यासाठीच्या वेबसाइटवरील तांत्रिक अडथळे व अन्य बाबींमुळे सवलतीसह मिळकतकर भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे. या १७ जून पर्यंत महापालिकेला १ हजार ३३ लाख एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. १७ जून या दिवशी १ कोटी ९३ लाख मिळाले आहेत. महापालिकेकडे १७ जून पर्यंत ७ लाख ३१ हजार ३४२ लोकांनी केला मिळकत कराचा भरणा केला आहे. अजून जवळपास ५ लाख असे लोक आहेत, ज्यांनी कर भरलेला नाही. त्यामुळे विभागाला अपेक्षा आहे २ हजार ८०० कोटी पर्यंत महसूल मिळेल. ऑनलाईन पद्धतीने करभरणा करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. मिळकतधारकापैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ५ लाख ९४ हजार ६९४ लोकांनी ८०८ कोटी जमा केले आहेत.