पुणेकरांनाे, पाणी वापरा जपून; साठा अडीच महिन्यांपुरताच, पाणी कपात आणखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:26 AM2023-06-15T10:26:17+5:302023-06-15T10:26:58+5:30

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आजमितीला ५ टीएमसी पाणी साठा शिल्लक

Pune residents, use water sparingly; The stock is only for two and a half months, will the water cut increase further? | पुणेकरांनाे, पाणी वापरा जपून; साठा अडीच महिन्यांपुरताच, पाणी कपात आणखी वाढणार?

पुणेकरांनाे, पाणी वापरा जपून; साठा अडीच महिन्यांपुरताच, पाणी कपात आणखी वाढणार?

googlenewsNext

पुणे : मान्सून राज्यात रविवारी दाखल झाला असला तरी, अजून तो महाराष्ट्रात बरसलेला नाही. त्यामुळे आधीच आठवड्यातून एक दिवस पुणेकरांवर आलेली पाणी कपात आणखी वाढणार का, असा प्रश्न निर्माण झाला असताना, सध्या तरी याबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आजमितीला ५ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. हा पाणी साठा पुणेकरांची आणखी अडीच महिने तहान भागवू शकणार आहे. सध्या तरी शेतीसाठी आवर्तन नसल्याचे जलसंपदा विभागाने अद्याप तरी कळविले नसल्याने हा सर्व पाणी साठा पुणेकरांसाठी उपलब्ध राहणार आहे.

दरराेजचा पाणी वापर १६५० एमएलडी

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरासह राज्यात येत्या आठ दिवसात पावसाची सुरुवात होणार आहे. यामुळे पाणी टंचाईबाबत सध्या तरी कोणतीही चिंता नाही. आजमितीला पुणे शहराला दररोज १६५० एमएलडी पाण्याची गरज असून, उपलब्ध पाणी साठ्यानुसार ते किमान पुढील अडीच महिने पुणे शहराला पुरणार आहे.

वेधशाळेकडून पुणे महापालिकेला अद्याप कोणतीही सूचना नाही

मान्सून लांबणार आहे की नाही, याबाबत वेधशाळेकडून पुणे महापालिकेला अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. जर पाऊस लांबणार असेल असे पत्र महापालिकेला मिळाले तर शहरातील पाणी पुरवठ्याबाबतच्या बदलाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. - अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग.

Web Title: Pune residents, use water sparingly; The stock is only for two and a half months, will the water cut increase further?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.