Pune Winter News: पुणेकरांना आता गुलाबी थंडीचा सुखद अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 01:11 PM2021-12-13T13:11:08+5:302021-12-13T13:11:20+5:30
राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे : गेल्या काही दिवस बदलत्या वातावरणामुळे कधी पाऊस, तर कधी उकाडा मधूनच थंडीचा कडाका अनुभवणाऱ्या पुणेकरांना आता गुलाबी थंडीचा सुखद अनुभव येऊ लागला आहे. रविवारी सकाळी पुणे शहरात राज्यातील सर्वात कमी किमान तापमान १४.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याने, बऱ्याच ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये) पुणे १४.१, मुंबई २३.२, सांताक्रुझ २१.४, रत्नागिरी २३.२, डहाणू २१.६, पणजी २३, जळगाव १५.६, कोल्हापूर २०, महाबळेश्वर १५, मालेगाव १७.४, नाशिक १४.८, सांगली १९.९, सातारा १६.६, सोलापूर १६.२, औरंगाबाद १४.२, परभणी १५.८, नांदेड १८.२, अकोला १७.४, अमरावती १४.९, बुलडाणा १५.२, ब्रह्मपुरी १५, चंद्रपूर १६, गोंदिया १४.६, नागपूर १४.४, वाशिम १७, वर्धा १५.५.