पुणेकरांना वर्षभर पाणीटंचाई भासणार नाही; खडकवासलासहीत तिन्ही धरणं भरली १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:18 PM2021-09-14T13:18:35+5:302021-09-14T13:23:44+5:30

खडकवासला धरणातून मुठा नदीत काल सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले

Pune residents will not face water scarcity throughout the year; All the three dams including Khadakwasla are 100 percent full | पुणेकरांना वर्षभर पाणीटंचाई भासणार नाही; खडकवासलासहीत तिन्ही धरणं भरली १०० टक्के

पुणेकरांना वर्षभर पाणीटंचाई भासणार नाही; खडकवासलासहीत तिन्ही धरणं भरली १०० टक्के

googlenewsNext
ठळक मुद्देब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं भरलं १०० टक्केपिंपरी - चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरणही १०० भरलं टक्के

पुणे : पुणे जिल्ह्यात गणरायाच्या आगमनापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्य़ातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधूनपाणीपुरवठा केला जातो. शहरातही पावसाचा जोर वाढल्यानं खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के  भरली आहेत. चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ाच्या सीमेवरील उजनी धरणात ६७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांसह वडज, कळमोडी, चासकमान, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी,  गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर या जिल्ह्य़ातील अन्य धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

शहराला हंगामात प्रथमच २२ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. पानशेत धरण ३ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १९ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरणसाखळीमधील टेमघर धरण १३ सप्टेंबरला भरल्याने चारही धरणांमधील पाणीसाठा २९.१५ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच १०० टक्के  झाला आहे. 

दिवसभरात टेमघर धरण परिसरात ४५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रांत प्रत्येकी २७ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चारही धरणे १०० टक्के  भरली असल्याने टेमघर धरणातून ३०० क्युसेक वेगाने, वरसगाव धरणातून २६६५ क्युसेकने, पानशेत धरणातून २६९२ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत काल सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
 
दरम्यान ब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं १०० टक्के भरलं असून धरणाच्या ४५ स्वयंचलीत ४५ पैकी ११ स्वयंचलित दरवाजातून ११७१ क्युसेसने प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं आहे. भाटघर धरणचा पाणीसाठा २४ टीएमसी आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के भरले आहे. या धरणातून दिवसभरात २१०० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्य़ातील अन्य धरणांच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

 

Web Title: Pune residents will not face water scarcity throughout the year; All the three dams including Khadakwasla are 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.