पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 02:16 AM2018-09-18T02:16:06+5:302018-09-18T02:17:50+5:30
स्वतंत्र मोबाईल क्रमांक; नागरिकांचा व्हॉट्सअॅप, फेसबुकद्वारे होणार संपर्क
बारामती : नुकतीच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे घेतलेल्या संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट ’ बनणार आहे. त्यासाठी पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, उपविभागाला स्वतंत्र मोबाईल क्रमांक पुरविला आहे. यावर इंटरनेट कायम सुरू राहणार असल्याने सर्वसामान्य नागरिक या मोबाईल क्रमांकांद्वारे व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून पोलिसांशी तातडीने संपर्क साधू शकणार आहे. त्यातून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या मदतीचा हात तातडीने मिळणार आहे.
त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांशी आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरूनही संपर्क साधता येणार आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांच्या अभिनव कल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे पोलिसांशी व्हॉट्सअॅप, तसेच फेसबुकच्या माध्यमातून थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. तरुणाईसह सर्वच वयोगटांतील नागरिकांकडे इंटरनेटयुक्त मोबाईल आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
सोशल मीडियाद्वारे ‘लोकाभिमुख पोलिसिंग’
हे मोबाईल क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिक त्यांच्या तक्रारीबाबतची माहिती, अन्य उपलब्ध होणारी उपयुक्त माहिती, फोटो, व्हिडिओ या मोबाईल क्रमांकांवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवू शकतात. सर्वसामान्य नागरिक या मोबाईल क्रमांकांवरून कॉल करूनसु्द्धा माहिती देऊ शकतात. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याशी फेसबुक व टिष्ट्वटरच्या माध्यमातूनही संपर्क करू शकतात .
याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पोलीस अधीक्षकांच्यावतीने पुरविण्यात आलेला मोबाईल कायम पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराकडे असणार आहे. शहरातील महत्त्वाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी ‘कनेक्टिव्हिटी’ राहणार आहे. बेकायदा, चुकीच्या बाबी पोलिसांपर्यंत पोहोचणार आहेत.
पोलीस ठाणे व मोबाईल क्रमांक असे
बारामती (एसडीपीओ) ९५५२२३०१००
बारामती शहर - ९५५२२८७१००
बारामती तालुका - ९५५२२९३१००
इंदापूर - ९५५२२९८१००
वालचंदनगर - ९५५२३६८१००
भिगवण - ९५५२३८६१००
वडगाव निंबाळकर - ९५५२३९७१००
दौंड (एसडीपीओ) - ९५५२६३०१००
दौंड - ९५५२६१२१००
शिरुर - ९५५२६३४१००
शिक्रापूर - ९५५२६५३१००
यवत - ९५५२६५४१००
रांजणगाव एमआयडीसी - ९५५२६७६१००
भोर (एसडीपीओ) - ९५५२६५०१००
जेजुरी - ९५५२६७८१००
सासवड - ९५५२६८७१००
राजगड - ९५५२६८९१००
भोर - ९५५२५९३१००
हवेली (एसडीपीओ) - ९५५२४८२१००
हवेली - ९५५२७५३१००
लोणी काळभोर - ९५५२७७८१००
वेल्हा - ९५५२८१३१००
लोणीकंद - ९५५२८९३१००
खेड (एसडीपीओ) - ९५५२८९०१००
खेड - ९५५२१९२१००
घोडेगाव - ९५५२०९७१००
मंचर - ९५५२०९४१००
जुन्नर (एसडीपीओ) - ९५५२९५०१००
जुन्नर - ९५५२१६४१००
नारायणगाव - ९५५२१३७१००
ओतूर - ९५५२१५७१००
आळेफाटा - ९५५२१८६१००
देहूरोड (एसडीपीओ) - ९५५२२०६१००
पौड - ९५५२४६४१००
लोणावळा (एसडीपीओ) ९५५२७८०१००
लोणावळा शहर - ९५५२०२६१००
लोणावळा ग्रामीण - ९५५२०६३१००
कामशेत - ९५५२०६९१००
वडगाव मावळ - ९५५२०१८१००
सायबर पोलिस ठाणे - ९५५२६७०१००
एलसीबी - ९५५२६८०१००
नियंत्रण कक्ष— ९५५२६९०१००