Video: पुणे - पिंपरीत 'हर हर महादेव' चे शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:54 PM2022-11-07T16:54:48+5:302022-11-07T16:56:26+5:30
इतिहासाची मोडतोड करणारा तसेच खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा
पुणे/पिंपरी : ''हर हर महादेव'' या चित्रपटात प्रचंड मोठया प्रमाणात बदनामी केली.त्यामुळे या चित्रपटाचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दाखविण्यात येणारे शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले आहेत. दोन्ही शहरात पुन्हा चित्रपट दाखविण्यात येऊ नयेत, अन्यथा हे शो संभाजी ब्रिगेडच्या वतीने बंद पाडण्यात येतील, असा इशाराही पुण्यातून संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि पिंपरीतून शहराध्यक्ष सतीश काळे आणि यांनी दिला.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मध्ये घुसून घोषणाबाजी करत चित्रपट चा शो सोमवारी (दि.०७) दुपारी १ च्या सुमारास संभाजी ब्रिगेड व छावा संंघटनेने बंद पाडला. इतिहासाची मोडतोड करणारा तसेच खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी आहे.
संतोष शिंदे म्हणाले, चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून 'हर हर महादेव...' चित्रपट तयार केला आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात...' हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा. सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर... छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका...! गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येऊ येणार नाही. सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये हर हर महादेव चे शोज बंद पाडले #Pune#cinemapic.twitter.com/juU43LYviQ
— Lokmat (@lokmat) November 7, 2022
पिंपरीतून संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे म्हणाले, हर हर महादेव या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे.शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदल देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवल्याचे म्हटले आहे.