पुणे : वाळू माफियांनी जेसीबी मशिनखाली चिरडून शेतक-याची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 01:11 PM2017-11-17T13:11:21+5:302017-11-17T13:14:47+5:30
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथे वाळू माफियांनी एका शेतकऱ्यास जेसीबी मशिनखाली चिरडून ठार केले आहे. वाळू माफियांच्या बेफाम मुजोरीने शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
पुणे : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथे वाळू माफियांनी एका शेतकऱ्यास जेसीबी मशिनखाली चिरडून ठार केले आहे. वाळू माफियांच्या बेफाम मुजोरीने शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. रोहिदास पोकळे (वय ४८) असे हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वाळू माफियांनी पोकळे यांच्या अंगावर जेसीबी मशिन घालून त्यांना चिरडले. यामध्ये पोकळे यांचा मृत्यू झाला आहे. वाळू माफियांच्या हैदोसाने पोकळे या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने वाळू माफियांवर जर वेळीच लगाम घातला असता तर पोकळे यांचा जीव वाचला असता.
शिरूर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू माफियांना स्थानिक नेत्यांसह प्रशासनाची साथ असल्यामुळे ते कुणालाच घाबरत नाहीत. या बाबतीत वृत्तपञाने वेळोवेळी वृत्त प्रसारीत करूनही प्रशासनाला जाग येत नाही. यापुढे तरी येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोकळे यांच्या मृत्यूमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत.