पुणे-सातारा महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:18+5:302020-11-27T04:04:18+5:30

\Sपुण्यात कात्रजजवळील घटना : तीन जण गंभीर जखमी पुणे : पुणे-सातारा महामार्गावर कात्रज आंबेगाव येथे पहाटे आठ वाहने एकमेकांवर ...

On the Pune-Satara highway | पुणे-सातारा महामार्गावर

पुणे-सातारा महामार्गावर

Next

\Sपुण्यात कात्रजजवळील घटना : तीन जण गंभीर जखमी

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर कात्रज आंबेगाव येथे पहाटे आठ वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत़ अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने गाड्या बाजूला करून आतील वाहनचालकांची सुटका केली़ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी कृष्णाप्पा चंद्राप्पा देवप्पानवर (वय ३४, रा़ धारवाड, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन धनुष सेल्वम (रा़ तिरुपत्तूर, तामिळनाडु) याच्यावर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ बसवाराज बसवनाप्पा चंद्रागी (वय २७, रा़ कर्नाटक) हे जखमी झाले आहेत़

गारगोटीवरुन पेणला छोटे दगड घेऊन ट्रक चालला होता़ स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर त्याला पाठीमागून येणाºया ट्रकने धडक दिली़ रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाला होता़ देवप्पानवर हे कंटेनर घेऊन बेळगावहून पुण्याकडे येत होते़ बंगलोर महामार्गावरुन ते स्वामी नारायण मंदिराजवळ आले़ त्यावेळी नऱ्हे येथे झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती़ त्यामुळे त्यांनी कंटेनर थांबविला़ त्यांच्यापुढे एक कार थांबली होती़ त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या धनुषच्या ट्रकने कंटेनरला मागाहून जोरात धडक दिली़ त्या मुळे कंटेनर पुढे थांबलेल्या कारला जाऊन धडकला़ धनुषच्या ट्रकलाही मागाहून आलेल्या ट्रकने जोरात धडक दिली़ त्यात ट्रकमधील ज्ञानसागर नारायण याच्या डोक्याला मार लागला व पाय फ्रॅक्चर झाला़

या गाड्या एकमेकांना धडकल्याने त्यात अडकून पडले होते़ त्यामुळे कारमधील दोघे आणि ट्रकचालक हे आतमध्ये अडकून पडले होते. पोलिसांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने लोकांना बाहेर काढून रुग्णालयात पाठविले़ क्रेनद्वारे ही वाहने बाजूला करुन आतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात २ कार आणि ६ ट्रक एकमेकांना काही काही अंतरावर धडकले आहेत.

--------

ट्रकचालकाची सुटका

या अपघातात एक ट्रकचालकाचे पाय केबिनमध्ये अडकले होते़ त्याला प्रथम रेस्क्यु करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले़ पीएमआरडीएची रेस्क्यु व्हॅन आणि पुणे अग्निशामन दलाचे अधिकारी, कर्मचारी यांनी इतर अडकलेली वाहने काढून जखमीला रुग्णालयात पाठविले़ सिंहगड रोड स्टेशन आॅफिसर प्रभाकर उमरटकर व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली़

Web Title: On the Pune-Satara highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.