पुणे-सातारा प्रवास महागणार, खेड-शिवापूरच्या टोलमध्ये पाच टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:25 IST2023-03-29T11:23:07+5:302023-03-29T11:25:01+5:30
आता कार चालकांना नव्या दरानुसार १७५ रुपये मोजावे लागणार...

पुणे-सातारा प्रवास महागणार, खेड-शिवापूरच्या टोलमध्ये पाच टक्के वाढ
नसरापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्गावरून जाणाऱ्यांचा प्रवास आता महाग होणार आहे. १ एप्रिलपासून खेड-शिवापूर टोलच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. आता कार चालकांना नव्या दरानुसार १७५ रुपये मोजावे लागणार आहेत.
पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चारचाकी व इतर व्यावसायिक वाहनांच्या टोलच्या किमतीमध्ये १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली. यामध्ये कार, जीप, व्हॅनसाठी १६५ रुपये लागणाऱ्या टोलचे आता नवीन नियमानुसार १७५ रुपये लागणार आहेत.
हलकी व्यावसायिक वाहनं २६५ रुपये आता नवीन दरानुसार २८० रुपये, बस, ट्रक पूर्वी ५६० रुपये, नवीन दर ५८५ रुपये, जड बांधकाम मशिनरी जड वाहने पूर्वी ८७५ रुपये आता ९२० रुपये, मोठ्या आकाराची वाहने पूर्वी १०६५ रुपये आता ११२० रुपये.