पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी! दहशतवाद्यांचा देशविघातक कृत्याचा होता इरादा

By नम्रता फडणीस | Published: July 25, 2023 07:52 PM2023-07-25T19:52:41+5:302023-07-25T19:53:48+5:30

या आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढवण्यात आले आहे.

Pune, Satara, Kolhapur forest bomb test! The intention of the terrorists was to carry out anti-national acts | पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी! दहशतवाद्यांचा देशविघातक कृत्याचा होता इरादा

पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी! दहशतवाद्यांचा देशविघातक कृत्याचा होता इरादा

googlenewsNext

पुणे : कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. दोघेही इसिसच्या अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले असून, घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारण्यापासून प्रशिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पद्धती दोघांनी आत्मसात केल्या होत्या. या आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढवण्यात आले आहे.

दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दहशतवाद विरोधी पथकाने तपासादरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटके असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टरमध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

  • दहशतवाद्यांकडून जप्त केलेली पावडर ही स्फोटके असल्याचे एक्स्प्लोझिव्ह वेपर डिटेक्टरमध्ये स्पष्ट
  • देशविघातक कारवाई करण्याचा उद्देश असल्याचे पेनड्राइव्हमधून आले समोर
  • पेनड्राइव्हमधून निघालेल्या माहितीचा ४३६ पानांचा तपास अहवाल न्यायालयात सादर

Web Title: Pune, Satara, Kolhapur forest bomb test! The intention of the terrorists was to carry out anti-national acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.