भाजपने दबाव टाकल्याचे सांगत कसब्यातील शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:01 PM2019-10-16T18:01:10+5:302019-10-16T18:04:17+5:30

कसब्यातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Pune Shiv Sena's collective resignation saying BJP was under pressure | भाजपने दबाव टाकल्याचे सांगत कसब्यातील शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा

भाजपने दबाव टाकल्याचे सांगत कसब्यातील शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा

Next

पुणे : कसब्यातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे.भाजपचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यात याबाबतची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

कसबा मतदार संघातून भाजपने पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसकडून काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे निवडणूक लढवत आहेत.

विशाल धनावडे म्हणाले, भाजपकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकवण्यात येत आहे. रोज त्रास देण्यात येत आहे. नेत्यांकडे सातत्याने तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांना आम्हाला पक्षातून काढून टाकण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये तसेच त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही कसब्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा सामूहिक राजीनामा दिला आहे.

Web Title: Pune Shiv Sena's collective resignation saying BJP was under pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.