‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निर्मिती व्हावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:46+5:302021-08-20T04:14:46+5:30
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीतर्फे उभारण्यात आलेल्या विश्वराज फिल्म स्टुडिओच्या उद्घाटनप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर बोलत होते. यावेळी ...
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीतर्फे उभारण्यात आलेल्या विश्वराज फिल्म स्टुडिओच्या उद्घाटनप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर बोलत होते. यावेळी आध्यात्मिक गुरू श्रीकृष्ण ऊर्फ कर्वे गुरूजी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड ,ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पत्रकार प्रसन्न जोशी, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, एमआयटीने सुरू केलेल्या विश्वराज फिल्म स्टुडिओच्या माध्यमातून या देशात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी तयार व्हावेत. तसेच भविष्यात ही वास्तू म्युझियम ऑफ मॉडर्न ऑर्ट म्हणून देशभरात नावाजली जाईल. ही वास्तू म्हणजे चित्रपट सृष्टीतील आळंदी असेल.
कार्यक्रमात डॉ. विजय भटकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. विश्वनाथ कराड, प्रसन्न जोशी, डॉ. मंंगेश कराड यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पांडे, स्नेहा वाघटकर व डॉ. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन तर ज्योती कराड ढाकणे यांनी आभार मानले.