पुणे : सिंहगड घाटात कोसळली दरड, गडावर जाण्याचा मार्ग बंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 10:42 AM2018-07-08T10:42:49+5:302018-07-08T10:43:46+5:30

सिंहगड घाटा रविवारी (8 जुलै) पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हवेली पोलीस व वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला असून हजारो पर्यटकांची निराशा झाली आहे.

Pune: Sinhgad Ghat road Closed due to landslides | पुणे : सिंहगड घाटात कोसळली दरड, गडावर जाण्याचा मार्ग बंद  

पुणे : सिंहगड घाटात कोसळली दरड, गडावर जाण्याचा मार्ग बंद  

Next

पुणे : सिंहगड घाटा रविवारी (8 जुलै) पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हवेली पोलीस व वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला असून हजारो पर्यटकांची निराशा झाली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षी ३० जुलै २०१७ रोजी संध्याकाळी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती. तेथे जवळच आजचा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यावेळी असंख्य पर्यटक गडावर अडकून पडले होते. सुमारे ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा काढण्यात यश आल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करुन या पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. यंदा सुदैवाने पहाटे हा प्रकार घडल्याने गडावर पर्यटक नव्हते. 

दरम्यान, दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले असून यासाठी किती कालावधी लागणार याची निश्चित माहिती देता येणार नाही,असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र आज दिवसभर रस्ता बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाळा आणि त्यात रविवारी यामुळ हजारो पर्यटक खडकवासला, सिंहगडवर धाव घेतात. परंतु, या घटनेमुळे गडावरील रस्ता बंद झाल्याने अनेकांना अर्ध्या वाटेतून माघारी जावे लागले.

Web Title: Pune: Sinhgad Ghat road Closed due to landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.