पुणे ‘स्मार्ट सिटी’साठी मँकेंंझी करणार मदत

By Admin | Published: August 28, 2015 04:39 AM2015-08-28T04:39:50+5:302015-08-28T04:39:50+5:30

स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम २०मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील १०० दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी

Pune 'Smart City' help Mankinzhi | पुणे ‘स्मार्ट सिटी’साठी मँकेंंझी करणार मदत

पुणे ‘स्मार्ट सिटी’साठी मँकेंंझी करणार मदत

googlenewsNext

पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम २०मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील १०० दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून, त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापालिकेने राज्य शासनाने या संदर्भात घेतलेल्या स्पर्धेपाठोपाठ केंद्र शासनाच्या पहिल्या फेरीतील स्पर्धेतही पुण्याचा समावेश झाला आहे. परंतु, खरी स्पर्धा पुढील टप्प्यात आहे. स्पर्धेच्या नियमानुसार पुढील १०० दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांचा आणि सुविधांचा विस्तृत आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर करायचा आहे. हा आराखडा तज्ज्ञ सल्लागाराकडून तयार करून घेण्यात येणार असून, सल्लागार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याकरिता महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात मँकेंंझी या संस्थेला काम देण्यात येणार आहे. यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात हा निधी नसल्याने सांडपाणी विभागाच्या निधीतून १ कोटी ६० लाख रुपये वर्गीकरणाद्वारे देण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी ६० ते ६५ प्रश्नांची सूची केंद्र शासनाने तयार केली आहे. त्यानुसार शहरात काय सुविधा देणार, याचे नियोजन विकास आराखड्याच्या माध्यमातून सादर करायचे आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या १०० शहरांपैकी २० शहरे या वर्षी योजनेसाठी निवडली जातील. पुढील वर्षी उर्वरित ८० शहरांमधून २० शहरांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यातच शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड होण्यासाठी चांगली तयारी करण्यात येईल. तज्ज्ञ सल्लागारांसोबतच शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सूचना घेण्यात येतील.
- कुणाल कुमार
(महापालिका आयुक्त)

Web Title: Pune 'Smart City' help Mankinzhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.