पुणे-सोलापूर महामार्गावर कचऱ्याचे ढीग जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:23 AM2019-02-01T02:23:58+5:302019-02-01T02:24:14+5:30
महामार्ग प्राधिकरण, टोल प्रशासनाचे दुर्लक्ष
भिगवण : देशभरात स्वच्छतेचा जागर सुरू असताना भिगवण येथे पुणे-सोलापूर महामार्गावर कचºयाचे ढीग जैसे थे आहेत. हा महामार्ग आहे कि कचरा कुंडी असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. तर लाखो रुपयाचे देखभाल दुरुस्ती साठी बील वसूल करणाºया महामार्ग देखभाल प्राधिकरण आणि टोल प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. परिणामी या कचराकुंडी मुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
पुणे-सोलापूर हा महामार्ग भिगवण गावातून आणि लोकवस्ती मधून जात असल्याने रस्ता तयार होताना दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. या दोन्ही सेवा रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते तसेच फळे विक्रेते आपले व्यवसाय थाटतात. विक्री न झालेला आणि खराब झालेला भाजीपाला तसेच सोबत घेवून जाण्या ऐवजी हा कचरा या महामार्गावर टाकण्यात येत आहे. तसेच महामार्गाशेजारी असणारे हॉटेल व्यावसायिक खराब झालेले शिळे अन्न रात्रीच्या वेळेस महामार्गावर असणाºया डिव्हायडर वर फेकून दिला जात आहे. त्यामुळे कचºयाच्या डोंगर साठत असून त्यावर ताव मारणे साठी डुकरे आणि कुत्री रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात.हा महामार्ग असल्याने वेगवान गाडीचा धक्का बसून त्यांना जीवाला मुकावे लागत आहे. तसेच यातून मोठा अपघात घडण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या तीन चार ठिकाणी हा कचरा टाकण्यात येत असल्याने त्या ठिकाणी रस्ते कंपनीनी सुशोभिकरणासाठी लावलेली झाडे जळून गेली आहेत. तसेच यातून मोठी दुगंर्धी पसरत असल्यामुळे या रस्त्यावरून जाताना नाकाला रुमाल लावणे भाग पडत आहे. या महामार्गावरून हायवे प्रशासनाचे पेट्रोलिंग वाहने तसेच देखभाल दुरुस्तीची अनेक वाहने जात असले तरी या कचराकुंडी कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.तर रस्ता साफसफाई साठी लाखो रुपयाचे बिल कंत्राटदार घेत असताना या कचराकुंडी बाबत हायवे प्रशासन आणि टोल प्रशासन विचारणा करीत नसल्याचे दिसून येत आहे.
सुचनांकडेही दुर्लक्ष
भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाने महामार्गावरील कचराकुंडी बाबत हायवे प्रशासनाला वेळोवेळी सूचना देवूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण करणाºया हायवे आणि टोल प्रशासना विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. कचºयामुळे येथे भटक्या मुक्या जनावराचा वावर वाढला असून त्यांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.