खळबळजनक! कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये राडा; स्वॅब घेतलेले सॅम्पल्स जमिनीवर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:45 PM2020-09-15T19:45:52+5:302020-09-15T20:07:47+5:30

नागरिकांचा राग अनावर झाल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालायला सुरूवात केली. इतकंच नाही तर सामानाची आदळ आपटही करण्यात आली. 

Pune swab samples thrown at the ground at covid testing center | खळबळजनक! कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये राडा; स्वॅब घेतलेले सॅम्पल्स जमिनीवर फेकले

खळबळजनक! कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये राडा; स्वॅब घेतलेले सॅम्पल्स जमिनीवर फेकले

Next

पुणे: कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस जगभरात वाढत आहे. पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसून येत आहे. अशा स्थितीत एक खळबळजनक घटना पुण्यातील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये घडली आहे. भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टिंग सेंटरवर हा वाद झाला. टेस्ट किट संपल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले नंतर नागरिकांचा राग अनावर झाल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालायला सुरूवात केली. इतकंच नाही तर सामानाची आदळ आपटही करण्यात आली. 

या दरम्यान संतप्त नागरिकांनी कसलाही विचार न करता टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले. भारतीय विद्यापीठासमोरील कोविड टेस्टिंग सेंटरजवळ  नागरिक सकाळपासून टेस्टिंग करण्यासाठी उभे होते. पण दुपारी टेस्ट किट संपल्याचं लक्षात आल्यामुळे नागरिकांना चाचणीसाठी नकार देण्यात आला. हे ऐकून नागरिकांना राग अनावर झाल्यानं अधिकारी आणि नागरिक यांच्या वाद झाला.  

पुण्यातल्या आंबेगाव येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृह येथेही चाचण्या केल्या जात होत्या. तिथे  अँटीजेन किट संपल्यामुळे आमची टेस्ट आधी करा, अशी मागणी करत काही नागरिकानी स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाव घेत घेतलेले स्बॅबचे सॅम्पल्सही जमीनीवर पाडले.  त्यामुळे कोविड टेस्टिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

आत्तापर्यंत एक लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात

दरम्यान शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. सोमवारी आजवर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला. बरे झालेल्यांचा आकडा १ लाख ५३२ झाला आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ८५ टक्के आहे.सोमवारी दिवसभरात ११०० रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १४५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९२८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३९३ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ३७२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २१ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ८३२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४५६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ५३२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ७८८ झाली आहे. दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८०७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ४५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

हे पण वाचा-

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: Pune swab samples thrown at the ground at covid testing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.