Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:25 IST2025-03-01T08:25:01+5:302025-03-01T08:25:54+5:30
Pune Crime News : आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे.

Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा
Pune Crime News ( Marathi News ) : स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला काल मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पुणे कोर्टासमोर उभे केले. यावेळी कोर्टाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुनावणी झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला. 'हा बलात्कार झालाच नाही, दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती तरुणी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात' असा खळबळजनक दावा केला.
पुणे न्यायालयात काल सुनावणीत कोर्टाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सुनावणीनंतर आरोपीचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. बलात्कार झालाचं नाही. जे झालं ते दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासुन ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, असं आरोपी दत्ता गाडेचे वकीलांनी सांगितले. दोघांमध्ये पैशाचा वाद झाला. दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला. गावाला पोलीस छावणीचे रुप आल्याने तो दडून बसला, असंही वकिलांनी सांगितलं.
आरोपीच्या वकिलांनी काय सांगितलं?
'हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला.तसेच तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलांनी केला.त्यामुळे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिली आहे. हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.
१२ मार्चपर्यंत कोठडी
न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.