Pune: २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या सापळ्यात
By नारायण बडगुजर | Published: March 18, 2024 11:22 PM2024-03-18T23:22:03+5:302024-03-18T23:22:34+5:30
Pune News: शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले. वडगाव मावळ येथे सोमवारी (दि. १८) पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.
- नारायण बडगुजर
पिंपरी - शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले. वडगाव मावळ येथे सोमवारी (दि. १८) पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.
सखाराम कुशाबा दगडे असे लाच स्वीकारलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम दगडे हे मावळ तालुक्यातील करुज येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार ४० वर्षीय व्यक्तीच्या शेताच्या गटाची फोड केली. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घ्यायची होती. त्यासाठी तलाठी दगडे यांनी त्यांच्याकडे ५० हजारांची लाच मागितली. याबाबत संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली. त्याची १५ मार्च रोजी पडताळणी केली. त्यावेळी तलाठी दगडे याने पंचांसमक्ष ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
एसीबीच्या पथकाने सोमवारी सापळा लावला. त्यावेळी तलाठी दगडे यांना लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजारांची लाच स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने दगडे याला ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात वडगाव मावळ तालुक्यात गुन्हा दाखल केला.