Pune| तरडोली पाझर तलाव तब्बल दोन वर्षांनी भरला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 05:03 PM2022-09-09T17:03:03+5:302022-09-09T17:03:43+5:30
मोरगाव ( पुणे ): तरडोली (ता. बारामती) येथील पाझर तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या तलावावर अवलंबून ...
मोरगाव (पुणे): तरडोली (ता. बारामती) येथील पाझर तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या पाच गावांच्या विहीर नळ पाणी योजना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. या पाण्याचे जलपूजन आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.
तरडोली येथील पाझर तलावावर तरडोली, मासाळवाडी,माळवाडी, बाबुर्डी, मोरगाव या गावांच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या नळ पाणी योजना पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. तलावातील पाण्याचे जलपूजन आज जलपूजन करण्यात आले. यावेळी तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर, सोमेश्वर कारखान्याच्या संचालक किसन तांबे, उपसरपंच महेंद्र तांबे, माजी सरपंच नवनाथ जगदाळे, संजय भापकर, दत्तात्रय पुणेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, भालेराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या तलावावर परिसरातील दहापेक्षा अधिक गावांच्या विहिरींची पाणी पातळी अवलंबून आहे. यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्या असल्याने या भागातील कमी झालेले ऊसाचे क्षेत्र पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकही या भागातील शेतकऱ्यांची शाश्वत होणार असल्याने शेतकरी आनंदित आहे.