पुण्यात तब्बल २७ लाख दुचाकींची नोंद, वर्षभरात पावणेतीन लाखांनी भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:36 AM2018-04-06T03:36:45+5:302018-04-06T03:36:45+5:30

पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता ‘दुचाकीकरांचे शहर’ अशीच करून द्यावी लागेल.

 In Pune, there were 27 lakh two-wheelers, a total of Rs | पुण्यात तब्बल २७ लाख दुचाकींची नोंद, वर्षभरात पावणेतीन लाखांनी भर

पुण्यात तब्बल २७ लाख दुचाकींची नोंद, वर्षभरात पावणेतीन लाखांनी भर

googlenewsNext

पुणे - पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता ‘दुचाकीकरांचे शहर’ अशीच करून द्यावी लागेल. कारण शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८०वर पोहोचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरात (एप्रिल २०१७ ते मार्च २०१८) दुचाकींच्या संख्येत २ लाख ५ हजार ८०४ ने वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ४५ हजार ६८३ वर पोहोचली असून, त्यात ५६ हजार ४१० वाहनांची भर पडली.
टॅक्सी कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलिव्हरी व्हॅनच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्कूल बस, रुग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ट्रेलर, मालवाहू वाहनांची विक्री गेल्यावर्षी इतकीच झाली आहे. रिक्षांचा परवाने खुले केल्याने या वर्षी ८ हजार २२३ नवीन रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. आता शहरातील रिक्षांची संख्या ५३ हजार २२७ इतकी झाली आहे.
टॅक्सी कॅबच्या संख्येत ५ हजार ६४८ ने वाढ झाली असून, त्यांची संख्या २८ हजार ३४४ झाली आहे. चारचाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या ४ हजार ३५३ ने वाढून ४७ हजार १३५ आणि तीनचाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या १ हजार ५२२ ने वाढून ३३ हजार ८९५ झाली आहे.
ट्रक-लॉरीची संख्या ३ हजार ८९० ने वाढून ३८ हजार ५९८ वर पोहोचली आहे. स्कूल बसच्या संख्येत २८३ ने वाढ झाली असून, ती २ हजार ५६४ झाली.
पुणे शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. गेल्या ७ वर्षांत लोकसंख्येत ४ लाखांची वाढ गृहित धरली, तरी शहरातील वाहनांची संख्या दरडोईपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

वाहन नोंदणीचे वार्षिक उड्डाण
वाहन प्रकार २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८
दुचाकी १,४५,७९४ १,६६,१९९ १,७८,१५७ १,७९,६७३ २,०५,८०४
चारचाकी ४१,५०७ ४५,९४४ ४६,६०९ ४९,७५५ ५६,४१०
एकूण वाहने १,९७,०२८ २,३३,५९६ २,४९,४७८ २,७०,३०७ २,८९,९१०

Web Title:  In Pune, there were 27 lakh two-wheelers, a total of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.