देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:28 AM2021-08-17T11:28:51+5:302021-08-17T11:29:06+5:30

लोकसंख्येच्या एकूण ९४ टक्के नागरिकांचे झाली तपासणी

Pune tops the list; Corona test of '30 lakh' people in the city till August 15 | देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी

देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी

Next
ठळक मुद्देशहरात कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रूग्ण कोरोनामुक्त

निलेश राऊत

पुणे : शहरात ९ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर, प्रत्येक कोरोना संशयिताची तपासणी करण्याची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली़ परिणामी रविवार १५ ऑगस्टपर्यंत शहरात लोकसंख्येच्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार) ९४ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. तर गत दहा वर्षातील शहरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन, पुणे महापालिका हद्दीत साधारणत: आजच्या लोकसंख्येच्या सुमारे ९० टक्के नागरिकांची म्हणजेच, तब्बल ३० लाख ४ हजार ७३९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.  
    
कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर, प्रारंभी महापालिकेच्या विविध तपासणी केंद्रांवर संशयित कोरोना संशयितांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येत होती. या चाचणीचा ‘एनआयव्ही’ या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास साधारणत: ४८ तास म्हणजेच दोन दिवस लागत असे. परंतु, कोरोना संसर्गाचे जसे प्रमाण वाढत गेले. तसे तपासणीची आणखी सहज सुविधा उपलब्ध झाली व जून, २०२० अखेर ‘आरटीपीसीआर’सह ‘अ‍ॅण्टीजेन’ ही अवघ्या काही मिनिटात चाचणीचा अहवाल देणारी कोरोना चाचणी शहरात सुरू झाली. तर यानंतर काही दिवसांतच काळात खाजगी प्रयोगशाळांनाही कोरोना चाचणीची परवागनी मिळाली.  
    
शहरात पहिल्यापासूनच संशयितांची कोरोना चाचणी करून कोरोनाबाधितांना इतरांपासून लागलीच विलग करणे, यामुळे आज पुणे शहराने पहिल्या व दुसऱ्या लाटेवर इतर शहरांच्या तुलनेत यशस्वी मात केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोना चाचणीचा हा आकडा ३० लाखाच्यापुढे गेला आहे.  रविवारी सायंकाळपर्यंत शहरात ३० लाख ४ हजार ७३९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १६ टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची ही एकूण संख्या ४ लाख ९०  हजार  ४४६ जण इतकी आहे. 

शहरात कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रूग्ण कोरोनामुक्त 
 
दरम्यान एकूण कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही संख्या ४ लाख ७९ हजार ५०१ इतकी आहे.  तर आजपर्यंत शहरात पुणे महापालिका हद्दीतील आजपर्यंत ८ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी २ टक्के रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या या कोरोनाबाधित रूग्णांपैकी बहुतांशी रूग्ण हे अन्य आजाराने ग्रासलेले होते तर बहुतांशी जण हे वयाची ६० पार केलेले होते.  
    
शहरात १५ ऑगस्ट पर्यंतची स्थिती 

एकूण कोरोना चाचण्या :- ३० लाख ४ हजार ७३९ 
एकूण कोरोनाबाधित :- ४ लाख ९० हजार ४४६ 
एकूण कोरोनामुक्त :- ४ लाख ७९ हजार ५०१ 
कोरोनामुळे मृत्यू :- ८ हजार ८४७ 

Web Title: Pune tops the list; Corona test of '30 lakh' people in the city till August 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.