स्वच्छतागृहांच्या बांधणीत पुणे राज्यात अव्वल
By admin | Published: July 29, 2016 04:06 AM2016-07-29T04:06:32+5:302016-07-29T04:06:32+5:30
शहर २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने पुणे महापालिकेची वाटचाल सुरू असून, नुकताच पालिकेने झोपडपट्ट्यांमध्ये दहा हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे
पुणे : शहर २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने पुणे महापालिकेची वाटचाल सुरू असून, नुकताच पालिकेने झोपडपट्ट्यांमध्ये दहा हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्याचा टप्पा ओलांडला आहे. सध्या ‘स्वच्छ भारत’अंतर्गत स्वच्छतागृहे उभारणीमध्ये पुणे राज्यात अव्वल ठरले असून, महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याची माहिती महापौरांनी दिली.
लोकांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवू नयेत याकरिता स्वच्छ भारत अंतर्गत हगणदारीमुक्त शहर ही योजना राबविली जात आहे. यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी केंद्र, राज्य
व महापालिकेकडून अनुदान दिले
जात आहे.
याअंतर्गत नुकतीच १० हजार शौचालये बांधण्यात आली आहेत, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. आणखी ७ हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. आॅक्टोबर २०१७ पूर्वी राज्यातील सर्व शहरे हगणदारीमुक्त करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. पुणे महापालिका यात सर्वांत आघाडीवर आहे. (प्रतिनिधी)