पुण्यातील व्यापारी बुधवारपर्यंत दुकाने बंदच ठेवणार; मात्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:36+5:302021-04-13T04:11:36+5:30

पुणे : संपूर्ण लॉकडाऊन झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील. मात्र, संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही तर आम्ही ...

Pune traders to keep shops closed till Wednesday; Only ... | पुण्यातील व्यापारी बुधवारपर्यंत दुकाने बंदच ठेवणार; मात्र...

पुण्यातील व्यापारी बुधवारपर्यंत दुकाने बंदच ठेवणार; मात्र...

Next

पुणे : संपूर्ण लॉकडाऊन झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील. मात्र, संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही तर आम्ही दुकाने उघडू, असा इशारा देत बुधवारपर्यंत (१४ एप्रिल) पुण्यातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी दिली.

रांका म्हणाले, रविवारी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सौरभ राव यांनी पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. हदयाच्या तळापासून या अधिकाऱ्यांनी दुकाने उघडू नका अशी विनंती केली. व्यापाऱ्यांनी ही विनंती मान्य केली आहे. मात्र, पुणे आणि राज्यातील इतर शहरांतील चित्र पाहिले तर जास्त गर्दी ही जीवनावश्यक वस्तूंसाठी होत आहे. मार्केटयार्डात भाजीपाला खरेदी करताना निर्बंधांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे कोराना रोखण्यासाठी खरे तर संपूर्ण लॉकडाऊन करायला हवा. राज्य शासनाचा निर्णय दोन दिवसांत अपेक्षित आहे. मात्र संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाला नाही तर मात्र आम्ही आमची दुकाने उघडणार आहाेत.

ग्राहक आमची देवता, त्याला आणि पुण्याला कोराेनामुक्त करणे नैतिक कर्तव्य

लसीचा तुटवडा. रेमडेसिविरसाठी लोक वणवण फिरत आहेत. एका शहरात तर बेड नसल्याने एका रुग्णाला रिक्षात ट्रिटमेंट करावी लागली. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखली आहे.

आपण व्यापारी आहोत, ग्राहक आपली देवता आहे. त्यांना कोरोनामुक्त करणे ही व्यापाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे

कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते निर्णय घेतला आहे की राज्याने पूर्ण लॉकडाऊन केला तर त्याला संपूर्ण पाठिंबा द्यायचा मात्र, जर ई-कॉमर्स आणि इतर सेवा सुरू ठेवल्या तर व्यापरी १५ तारखेपासून आपली दुकाने उघडतील असा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

पूर्ण लॉकडाऊन केला तर तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले. १४ पर्यंत दुकाने उघडू नका, सरकारला सहकार्य करा अशी विनंती रांका यांनी सर्व ८२ संघटनांना केली आहे.

Web Title: Pune traders to keep shops closed till Wednesday; Only ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.