पुणे: राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाहतूक अडविली; तरुण मनसे कार्यकर्त्यांवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:18 AM2024-07-30T09:18:55+5:302024-07-30T09:20:32+5:30

Raj Thackeray Pune: राज ठाकरे ज्या ज्या भागात जात होते तिथे मनसे कार्यकर्ते आणि पोलीस वाहतूक रोखून धरत होते. एका पुणेकर तरुणाने या वाहतूक कोंडीला वैतागून मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांसमोर आपला संताप व्यक्त केला. 

Pune: Traffic blocked during Raj Thackeray's visit; Youth lashed out at MNS workers | पुणे: राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाहतूक अडविली; तरुण मनसे कार्यकर्त्यांवर भडकला

पुणे: राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाहतूक अडविली; तरुण मनसे कार्यकर्त्यांवर भडकला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी  विविध भागातील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज ठाकरे ज्या ज्या भागात जात होते तिथे मनसे कार्यकर्ते आणि पोलीस वाहतूक रोखून धरत होते. एका पुणेकर तरुणाने या वाहतूक कोंडीला वैतागून मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांसमोर आपला संताप व्यक्त केला. 

पुणेकर तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधीच पुण्यात वाहतूक कोंडीने वैताग आणलेला आहे. कित्येक वर्षे झाली आधी ओव्हरब्रिज बांधण्यासाठी रस्ते व्यापलेले, वाहतूक कोंडी आता ते ओव्हरब्रिज तोडून तिथे मेट्रोच पूल बांधण्यासाठी वाहतूक कोंडी असाच प्रकार सुरु आहे. यातच पुण्यातील लोकांचे निम्मा दिवस जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुराच्या समस्येमुळेही पुणेकर वैतागलेले आहेत. त्यातच राज ठाकरे पुण्यात आल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कार चालक तरुण चांगलाच भडकला होता. 

राज ठाकरे आल्याने तिथे कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी हा तरुण तिथून जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी त्याची कार बराच वेळ थांबविली. अखेर वैतागलेल्या तरुणाने कारच्या बाहेर येत मनसे कार्यकर्त्यांवर धावून जात या लोकांसाठी आमचा रस्ता का अडवला असा जाब विचारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राज ठाकरेंचा पुणे दौरा...
राज यांनी प्रशासनावर टीका केली.  महानगरपालिका, प्रशासन, जलसंपदा विभाग आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जगभरात पाणी सोडणार असल्यास ते अलार्म सिस्टिमद्वारे कळवतात. मग आपल्याकडे काही घोषणा अथवा सूचना देऊन का कळवले नाही असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.  सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबजनगरी राज ठाकरे भेट दिली. 

Web Title: Pune: Traffic blocked during Raj Thackeray's visit; Youth lashed out at MNS workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.