पुणेकरांमध्ये वाहतूक निरक्षरताच

By admin | Published: October 6, 2016 03:58 AM2016-10-06T03:58:01+5:302016-10-06T03:58:01+5:30

शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून

In Pune, traffic is illiterate | पुणेकरांमध्ये वाहतूक निरक्षरताच

पुणेकरांमध्ये वाहतूक निरक्षरताच

Next

पुणे : शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून, पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला असून, गेल्या १० महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या ९ लाख ६९ हजार कारवायांमध्ये तब्बल ११ कोटी ६० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी डिसेंबरअखेरपर्यंत १० कोटींचा दंड वसूल होण्याची शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांनी गुरुवारी १०० किलोमीटरची मानवी साखळी, पथनाट्ये यांद्वारे जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागामधून वाहतुकीचे साधेसाधे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. वर्षभर विविध मोहिमा, उपक्रम आणि जनजागृतिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते. परंतु, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत चालल्याचे एकंदरीत चित्र आहे.
किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासीनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालविणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग, वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीला अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालक करतात.
किरकोळ स्वरूपाच्या वाटणाऱ्या चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रियांच्या बाबतीतही ही संवेदनशीलता दिसत नाही. वेडीवाकडी वाहने चालविणे, मध्येच वाहन घालणे, रस्त्यावर वेडीवाकडी वाहने उभी करणे, दोन वाहनांमधून मार्ग काढत जाणे, लेनची शिस्त न पाळणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर, चिंचोळ्या आणि अरुंद रस्त्यांवरचे बेकायदा पार्किंग, व्यावसायिकांनी खाऊन टाकलेले इमारतींचे
पार्किंग यामुळे रस्त्यांवरच्या अपघातांमध्ये वाढ होत चालली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Pune, traffic is illiterate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.