वाहतूक पाेलीसांनी दिले अनेकांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 06:54 PM2018-04-12T18:54:25+5:302018-04-12T18:56:18+5:30
पुणे वाहतूक शाखेकडून अवयव प्रत्याराेपणासाठी घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वाट माेकळी करुन देण्यासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्यात येत अाहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेकडून असे 22 ग्रीन काॅरिडाॅर करण्यात अाले अाहे.
पुणे : पुण्याच्या वाढत्या वाहनसंख्येला शिस्त लावत असताना पुण्याच्या वाहतूक पाेलिसांनी अनेकांना जीवनदान दिले अाहे. गेल्या वर्षभरात भारतातील विविध भागातून प्रत्याराेपनासाठी अाणण्यात येणाऱ्या अवयवांसाठी पुणे वाहतूक पाेलिसांनी 22 ग्रीन काॅरिडाॅर तयार करुन या अवयव घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला रस्ता तयार करुन दिला अाहे.
पुण्यात अनेक माेठी हाॅस्पिटल्स अाहेत. अवयव प्रत्याराेपनाची चळवळ पुण्यात राबविण्यात येत अाहे. त्यामुळे अनेक रुग्ण पुण्यात उपचारासाठी येत असतात. काही नातेवाईक अापली प्रिय व्यक्ती या जगातून निघून गेल्यावर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतात. ताे अवयव एखाद्या गरजू रुग्णाला उपयाेगी पडू शकताे. अशावेळी ताे अवयव याेग्य वेळेत रुग्णालयापर्यंत पाेहचणे गरजेचे असते. अनेकदा पुणे विमानतळावर हे अवयव येत असतात. किंवा पुण्या जवळील एखाद्या रुग्णालयातून येत असल्यास रस्त्याच्या मार्गाने येत असतात. अशावेळी विमानतळ ते रुग्णालय तसेच पुणे अायुक्तालयाची हद्द ते ठराविक रुग्णालयापर्यंत अॅम्बुलन्सला पाेलिसांकडून वाट माेकळी करुन दिली जाते. तसेच कमीत कमी वेळेत अवयव रुग्णालयात पाेहचेल याची खबरदारी घेतली जाते. याला ग्रीन काॅरिडाॅर असे म्हंटले जाते. पुणे वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात असे 22 ग्रीन काॅरिडाॅर केले अाहेत. यामुळे प्रत्याराेपण करण्यात येणारे अवयव लवकरात लवकर रुग्णालयात पाेहचण्यास मदत झाली अाहे. 17 जानेवारी राेजी केलेल्या ग्रीन काॅरिडाेअरमध्ये मुंबईच्या काेकीलाबेन रुग्णालयातून पुण्यातील रुबी हाॅल क्लिनकपर्यंत अाणण्यात अाले. त्यात पुणे अायुक्तलयाची हद्द जेथून सुरु हाेते अश्या किवळे फाटा ते रुबी हाॅल अश्या 28 किलाेमीटरचे अंतर अवघ्या 19 मिनिटांमध्ये पार करुन अवयव सुखरुप रुग्णालयाता पाेहचविण्यात यश अाले हाेते.
असेच ग्रीन काॅरिडाॅर सातत्याने करण्यात येत असून, या माध्यमातून अनेकांना एक नवीन जीवन मिळत अाहे.