पुणे : तिहेरी हत्याकांड प्रकरण, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 08:23 AM2018-02-24T08:23:40+5:302018-02-24T08:23:40+5:30

गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली.

Pune: triple murder case, two people in police custody | पुणे : तिहेरी हत्याकांड प्रकरण, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे : तिहेरी हत्याकांड प्रकरण, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Next

पुणे :  गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. कचरा गोळा करण्याऱ्या दोन गटातील भांडणावरुन हे तिहेरी हत्याकांड प्रकरण घडल्याचं उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. 

दरम्यान, तीन मृतांपैकी दोन जणांची ओळख पटवण्यात पोलिसांनी यश आले आहे. मृतांमध्ये असलेल्या लहान मुलाचं नाव नावेद आहे तर दुस-या मृत व्यक्तीचे नाव संदीप अवसरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  संशयित आरोपी बाप्या उर्फ रवींद्र जगन सोनवणे आणि विक्रम दीपकसिंग परदेशी यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा संशयित आरोपी मुन्ना भंगारवाला फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दोघेही संशयित आरोपी हे गांजा, अन्य अमली पदार्थांच्या सेवनामुळे नशेत असून अद्याप त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. तरीही त्याचा गुन्ह्यात सहभाग असावा एवढे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध झाले आहेत. सोमवारी (23 फेब्रुवारी) संध्याकाळी पेठेतील नागझरीत 3 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) रवींद्र सेनगांवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ.बसवराज तेली, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सतीश निकम, सीताराम मोरे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम यांच्या शह इतर अधिकारी  व फरासखाना पोलिसांनी लावला आहे.

Web Title: Pune: triple murder case, two people in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.