पुणे : विधी सल्लागारासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात, हरकतीवर अनुकल अहवालासाठी मागितले ४० हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 11:52 PM2023-02-14T23:52:16+5:302023-02-14T23:52:32+5:30

प्रथमच अशा प्रकारची कारवाई

Pune Two with a legal adviser in the net of bribery demanded 40 thousand for a custom report on the movement | पुणे : विधी सल्लागारासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात, हरकतीवर अनुकल अहवालासाठी मागितले ४० हजार

पुणे : विधी सल्लागारासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात, हरकतीवर अनुकल अहवालासाठी मागितले ४० हजार

Next

पुणे : नवीन इमारतीमधील वीजेच्या मीटराबाबत घेतलेल्या हरकतीवर अनुकुल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणारा विधी सल्लागार व सहायक विधी अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार (रास्ता पेठ कार्यालय) आणि सहायक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण (गणेशखिंड महावितरण कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारणासाठी लाच घेतली जात असल्याचे प्रथमच उघड झाले असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची अशी पहिलीच कारवाई आहे.

याबाबतची माहिती अशी, पिंपरी गावातील जमीन एका बांधकाम व्यावसायिकाने विकसित केली होती. इमारत बांधून झाल्यानंतर जागा मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात आर्थिक वाद झाला. बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या नवीन इमारतींमध्ये इलेक्ट्रिक मीटर घेण्यासाठी अर्ज केला होता. जागा मालकाने त्यातील ११ इलेक्ट्रिक मीटर्स घेण्यावर हरकत घेतली होती. कायदेशीर वाद निर्माण झाल्याने महावितरणच्या गणेशखिंड विभागातील सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण यांच्याकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. त्यांनी ते रास्ता पेठ कार्यालयात सत्यजीत पवार यांच्याकडे पाठविले होते.

या दोघांनी त्या हरकतीवर अनुकुल अहवाल देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १८ व १९ जानेवारीला पडताळणी केली. त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Pune Two with a legal adviser in the net of bribery demanded 40 thousand for a custom report on the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.