पुणे विद्यापीठाकडून कॅसच्या मुलाखती पुन्हा रद्द; प्राध्यापक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 10:53 AM2020-12-23T10:53:18+5:302020-12-23T10:53:41+5:30
विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीशीसंलग्न महाविद्यालयामधील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती दोन वेळा रद्द करण्यात आल्या.वारंवार मुलाखती रद्द केल्या जात असल्याने प्राध्यापकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या 9 व 10 जनेवारीपूर्वी 'कॅस' चे कामकाज पूर्ण केले नाही तर विद्यापीठाच्या अधिसभेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा स्पुक्टो संघटनेने दिला आहे.
पुणे विद्यापीठातर्फे मार्च 2020 मध्ये संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या ह्यकॅसह्ण च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या मुलाखती स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्याचे नियोजन होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे प्रवासावरील येणा-या बंधनांमुळे त्या पुन्हा एकदा स्थगित केल्या. तसेच विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक प्रसिध्द करून येत्या 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत ह्य कॅसह्ण अंतर्गत 484 प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील,असे स्पष्ट केले होते. मात्र,पुन्हा एकदा विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या.
विद्यापीठाकडून वारंवार प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द केल्या जात असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेतर्फे कुलगुरू नितीन करमळकर यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या 8 जानेवारीपर्यंत कॅसची प्रक्रिया पूर्ण केल्यास 9 व 10 जानेवारी रोजी होणाऱ्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
'विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक'
प्राध्यापकांच्या कॅस बाबत शासनाने निर्देश दिलेले असताना विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या कॅस अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती वारंवार रद्द केल्या जात आहेत. विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या मंगळवारी झाल्या बैठकीत 9 व 10 जानेवारी रोजी होणाऱ्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. - प्रा.एस.पी.लवांडे, सचिव, एम.फुक्टो,