सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पेपर माेबाईलवर व्हायरल करणारा विद्यार्थी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:19 PM2018-05-26T19:19:48+5:302018-05-26T19:27:12+5:30
बॅकलाॅगचा पेपर माेबाईलद्वारे व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पथकाने ताब्यात घेतले अाहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभागाच्या पहिल्या वर्षाचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या विषयाचा पेपर माेबाईलद्वारे व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यापीठाकडून पकडण्यात अाले अाहे. अादर्श रवींद्रन असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने एमअायटी महाविद्यालयात पेपर सुरु असताना हा पेपर माेबाईलद्वारे बाहेर पाठवला हाेता. याप्रकरणी एमअायटी महाविद्यालयातर्फे पाेलिसांत तक्रार देण्यात येत अाहे. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयाच्या हलगर्जीपणाबद्दल कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अशाेक चव्हाण यांनी स्पष्ट केले अाहे.
अादर्श रवींद्रन हा विद्यार्थी एमअायटी महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकताे. ताे पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या विषयात अनुत्तीर्ण झाला हाेता. 23 मे राेजी एमअायटी महाविद्यालयात या विषयाचा पेपर सुरु असताना त्याने माेबाईलवर फाेटाे काढून हा पेपर बाहेर पाठवला हाेता. त्याने पेपर माेबाईलद्वारे बाहेर पाठविल्याचे विद्यापीठाच्या तपासात स्पष्ट झाल्याने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नेमलेल्या तपास पथकाने ही कारवाई केली अाहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अादर्श हा मूळचा केरळचा अाहे. ताे पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रवार 15 मिनिटे उशिरा पाेहचला हाेता. वर्गातील शिक्षकांची नजर चूकवून त्याने माेबाईल साेबत नेला. हा माेबाईल त्याच्या मित्राचा हाेता. अात जाताच त्याने प्रश्न पत्रिका घेऊन त्याची छायात्रित घेत वर्गाबाहेर पाठवली अाणि फाेन पुन्हा बॅगेत ठेवून दिला. विद्यापीठाचे तपास पथक शनिवारी अादर्शपर्यंत पाेहाेचले. त्याच्याकडे केलेल्या चाैकशीत त्याने गुन्हा कबूल केला अाहे. हा प्रकार एमअायटी महाविद्यालयात घडल्याने या महाविद्यालयाकडून या प्रकरणी पाेलिसांत गुन्हा नाेंदवण्यात येत अाहे. या संदर्भातील माहिती सविस्तर अहवाल अाल्यानंतर महाविद्यालयावर कारवाई करण्याबाबत परीक्षा विभाग निर्णय घेईल, असेही डाॅ. चव्हाण यांनी सांगितले.