पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार; विद्यार्थ्यांनो अंदाजित तारखाही ठरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 09:25 PM2021-02-09T21:25:34+5:302021-02-09T21:27:16+5:30

Pune University Exam: परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे 70 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच निकाल तयार करून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ आहे.

Pune University exams will be online from 15 to 20 march onwords | पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार; विद्यार्थ्यांनो अंदाजित तारखाही ठरल्या

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार; विद्यार्थ्यांनो अंदाजित तारखाही ठरल्या

googlenewsNext

 - राहुल शिंदे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार  आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत मंगळवारी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (Pune university Exam will be conduct from 15-20 March via online.)


 पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे 70 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच निकाल तयार करून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ आहे. त्यात कोरोनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. कोरोना काळात विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाने २०१९-२०२० शैक्षणिक वर्षातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. सुरवातीला या परीक्षा घेताना अडचणी आल्या असल्या तरी ; काही कालावधीनंतर त्यात सुधारणा झाल्या.


पुणे विद्यापीठाने कोरोनामुळे अंतिमवर्षाच्या विद्यार्थ्यांसह अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्याने वेळेची बचत होणार आहे. तसेच महिन्याभरात विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षेचा निकाल देणे शक्य होणार आहे. त्यामुळे २०२१- २१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा येत्या मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
 

कोरोनामुळे लांबलेल्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे मार्च महिन्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत मंगळवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ ते २० मार्च या कालावधीत तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा ३० मार्चपासून सुरु करावी, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठातर्फे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असल्या तरी या परीक्षांसाठी विद्यापीठाने जुन्या एजन्सीला परीक्षेचे काम देण्यापूर्वी कमी दरामध्ये काम करणा-या एजन्सीची चाचपणी करावी.
- राजेश पांडे,व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Pune University exams will be online from 15 to 20 march onwords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.