पुणे विद्यापीठ जाणार सातासमुद्रापार; कतार येथे 'मॅनेजमेंट कौन्सिल' केंद्र सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:38 PM2021-02-18T13:38:16+5:302021-02-18T13:39:17+5:30

गेले अनेक दिवस हा प्रस्ताव रखडला होता. यावर आज तातडीने चर्चा करुन मान्यता दिलेली आहे...

Pune University to go overseas; A 'Management Council' center will be set up in Qatar | पुणे विद्यापीठ जाणार सातासमुद्रापार; कतार येथे 'मॅनेजमेंट कौन्सिल' केंद्र सुरु होणार

पुणे विद्यापीठ जाणार सातासमुद्रापार; कतार येथे 'मॅनेजमेंट कौन्सिल' केंद्र सुरु होणार

Next

पुणे : कतार येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 'मॅनेजमेंट कौन्सिल' केंद्र उघडण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये विद्यापीठाने याची घोषणा केली होती. विद्यापीठाचे प्रतिनिधी या ठिकाणी भेटही देऊन आले होते. मात्र, या प्रस्तावाची मान्यता रखडली होती. 

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी ( दि. १८) व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.“गेले अनेक दिवस हा प्रस्ताव रखडला होता. यावर आज तातडीने चर्चा करुन मान्यता दिलेली आहे. आता लवकरच याची कार्यवाही सुरु होईल” असे उदय सामंत म्हणाले.

Web Title: Pune University to go overseas; A 'Management Council' center will be set up in Qatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.