पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 08:06 PM2018-05-24T20:06:01+5:302018-05-24T20:35:05+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका जाेशीचा मानाच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश झाला अाहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा राेवला गेला अाहे. विद्यापीठामधील बायाेइन्फाॅरमटिक्स व बायाेटेक्नालाॅजी विभागाची माजी (अायबीबी) विद्यार्थिनी प्रियंका जाेशी हिच्या संशाेधनात्मक कार्याचा फाेर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने गाैरव केला अाहे.
फाेर्ब्सच्या अंडर 30, सायन्स अॅन्ड हेल्थकेअर या अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव याेगदान देणाऱ्या युवा संशाेधकांची यादी प्रसिद्ध करण्यात अाली अाहे. त्यात प्रियंका हिची निवड करण्यात अाली अाहे. प्रियंका सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये रिसर्च फेलाे म्हणून काम करत अाहे. तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केंब्रिजमध्ये विद्यापीठामध्ये संशाेधन करण्यात सुरुवात केली हाेती.
प्रियंकाच्या संशाेधनामुळे मानवी मेंदूतील लहान रेणूंच्या अाैषधे अामि चयापचय्यांना अाेळकण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. अलझायमर राेगाचे मूळ कारण समजले जाणारे अमाइलाॅइड बीटा प्रथिने क्लंप तयार हाेण्याशी या प्रक्रियेचा निकटचा संबंध अाहे. या संशाेधनांतर्गत त्यांनी लहान रेणुंचा साठा तयार केली. यामधून केंब्रिज विद्यापीठामध्ये अल्झायमरवरील अाैषध तयार करण्यासाठी सुरु करण्यात अालेल्या संशाेधनास बळ मिळाले. विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रियंकाचे हे उल्लेखनीय यश बायाेइन्फाॅरमॅटिक्स व बायाेटेकनाॅलाॅजी विभागासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना या विभागाच्या विभागप्रमुख प्रा. अमिता रवीकुमार यांंनी व्यक्त केली.