सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये अधिकृत नाेंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 07:22 PM2019-08-29T19:22:57+5:302019-08-29T19:26:32+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेल्या राेप वाटपाच्या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नाेंद घेण्यात आली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेतर्फे राबविण्यात आलेल्या कडुलिंबाची राेपे वाटण्याच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंद घेण्यात आली आहे. यात एकूण 16661 विद्यार्थ्यांना एकाच वेळी ही राेपे वाटण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. देशातील एखाद्या विद्यापीठाच्या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नाेंद हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 23 जून राेजी राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांना कडुलिंबाची राेपे वाटण्याचा विक्रम करण्यात आला हाेता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित हाेते. यावेळी विविध महाविद्यालयांमधील 16661 विद्यार्थ्यांना कडुलिंबाच्या राेपांचे वाटप करण्यात आले हाेते. ही राेपे विद्यार्थी पंढरपूरपर्यंतच्या वारी मार्गामध्ये लावणार हाेते. मुलांना वाटण्यात आलेल्या राेपांपेक्षा अधिक राेपे वारी मार्गावर लावण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
याविषयी बाेलताना कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर म्हणाले, "विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या समाजाभिमुख उपक्रमांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही दाद आहे. आम्ही विक्रम व्हावा किंवा नाव व्हावे या हेतूने असे कार्यक्रम राबवत नाही. तरीही त्यातून विक्रम घडतो तेव्हा आनंद होतो. याद्वारे समाजात पर्यावरणाचे महत्व निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झालेले विद्यार्थी आणि विद्यापाठीतील सर्व घटकांचे सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो."
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले की, "असा विक्रम करणारे हे देशातील पहिलेच विद्यापीठ आहे. हे सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचेच फळ आहे. या विक्रमामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे.