Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच! अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:39 PM2021-06-18T19:39:22+5:302021-06-18T19:40:47+5:30

पुण्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली आल्यामुळे पुणेकरांना महापालिकेडून वाढीव दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

Pune Unlock: No relief for Pune citizens! Except for essential services, all shops and hotels are closed on Saturday and Sunday | Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच! अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार 

Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच! अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार 

googlenewsNext

पुणे : राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन'अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबत पाच टप्पे तयार केले असून त्यात पुणे दुसरे टप्प्यात आहे. त्यातच पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असून सक्रिय रुग्ण संख्या देखील तीन हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे शहरात महापालिकेडून वाढीव दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असूूून अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील इतर सर्व दुकाने, ब्युटीपार्लर,स्पा,मॉल,हॉटेल शनिवार आणि रविवारी बंदच राहणार आहे. तसेच नाट्यगृहे ,चित्रपटगृह सुरू करण्याबाबत सुधारित आदेशात उल्लेख करण्यात आलेला नाही. 

पुणे महापालिकेने शुक्रवारी(दि. १८) नवीन नियमावली जाहीर केली आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. येेेत्या सोमवार (दि.२२) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.

अशी आहे नवीन नियमावली... 

*दुकाने सकाळी ७  ते संध्याकाळी ७
* हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० (पार्सल रात्री ११ पर्यंत) 

* अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद
* संचारबंदी रात्री १० पासून
* उद्याने सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७
* Outdoor स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ , संध्याकाळी ५ ते ७ 
* अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत
* राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी 
* लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक
* शासकीय कार्यलये १०० टक्के क्षमतेने सूूरु
* खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू

Web Title: Pune Unlock: No relief for Pune citizens! Except for essential services, all shops and hotels are closed on Saturday and Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.