पुणे : आनंद सोहळ्याची उद्या वैभवी सांगता, तयारीत कार्यकर्ते मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:32 AM2017-09-04T02:32:51+5:302017-09-04T02:33:33+5:30

गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे़

Pune: Vaibhavi Samantha, Amitabh Bachchan | पुणे : आनंद सोहळ्याची उद्या वैभवी सांगता, तयारीत कार्यकर्ते मग्न

पुणे : आनंद सोहळ्याची उद्या वैभवी सांगता, तयारीत कार्यकर्ते मग्न

Next

पुणे : गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपतींबरोबरच प्रसिद्ध गणेश मंडळाचे रथ सज्ज होऊ लागले आहेत़ गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुण्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणा-या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला लागले आहेत.
कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाच मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता टिळक पुतळा येथून सुरू होईल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पाचही गणपतींची आरती करण्यात येईल. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. ढोल-ताशा व बँड पथकांच्या निनादात गणरायाला निरोप दिला जाणार आहे.
मानाचा पहिला-
कसबा गणपती
कसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती सकाळी नऊ वाजता मूर्तिकार मंडळाच्या मंडपात केली जाईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल. कामायनी मंदिर बँड पथक तसेच रमणबाग ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये असेल. त्याचप्रमाणे आर्ट आॅफ लिव्हिंग, रोटरी क्लबच्या पथकासह विदेशी नागरिकांचे दिंडी पथकही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
मानाचा दुसरा
तांबडी जोगेश्वरी गणपती
तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती मंडपामध्येच मंगळवारी सकाळी ९ वाजता होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. मिरवणुकीत गंधर्व बँड व शिवमुद्रा, ताल, शौर्य या ढोल-ताशा पथकाचा समावेश असेल. त्याचप्रमाणे सतीश आढाव यांचे नगारावादन होईल. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी होतील. तसेच घोड्यावर स्वार झालेल्या महिला व मुली हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल.
मानाचा तिसरा
गुरुजी तालीम गणपती
गुरुजी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक सरपाले बंधू यांनी फुलांच्या सहाय्याने साकारलेल्या पारंपरिक वाद्यांच्या संगीतमय रथातून सकाळी साडेदहा वाजता निघेल. बेलबाग चौकात पोलीस आयुक्तांच्या हस्ते आरती केली जाईल. शिवगर्जना पथक, नादब्रह्म पथक व चेतक ढोल ताशा पथक यंदा मिरवणुकीत असतील. तसेच नगारावादन हे वैशिष्ट्य असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीत उच्च प्रतीचा गुलालाचा कमी प्रमाणात वापर केला जाईल.
मानाचा चौथा
तुळशीबाग गणपती
तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी साकार केलेल्या गरुड रथातून काढली जाणार आहे. फुलांनी सजवलेल्या या गरुड रथातून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे़ यंदा मिरवणुकीत गजलक्ष्मी ढोल पथक, स्वरुपवर्धिनी ध्वज पथक आणि हिंद तरुण मंडळाचे गावठी ताल पथक ही तीन पथके असतील.
मानाचा पाचवा
केसरीवाडा गणपती
केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात होईल. मिरवणुकीत प्रताप बिडवे यांचे सनई चौघडावादन, श्रीराम, शिवमुद्रा ढोल ताशा पथक असणार आहे.

Web Title: Pune: Vaibhavi Samantha, Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.