Pune Vidhan Sabha 2024: पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान, इंदापूरमध्ये सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान हडपसरमध्ये सर्वात कमी ५०.११ टक्के

By नितीन चौधरी | Published: November 21, 2024 09:04 AM2024-11-21T09:04:16+5:302024-11-21T09:04:32+5:30

सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान इंदापूर मतदारसंघात; तर सर्वात कमी ५०.११ टक्के हडपसरमध्ये

Pune Vidhan Sabha 2024 The highest voter turnout of 76.10 percent was in Indapur constituency; while the lowest was 50.11 percent in Hadapsar. | Pune Vidhan Sabha 2024: पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान, इंदापूरमध्ये सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान हडपसरमध्ये सर्वात कमी ५०.११ टक्के

Pune Vidhan Sabha 2024: पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान, इंदापूरमध्ये सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान हडपसरमध्ये सर्वात कमी ५०.११ टक्के

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात तुलनेने शहरी भागापेक्षा मतदानाचा उत्साह जास्त होता. परिणामी जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी चांगली राहिली आहे. मतदार यादीतील दूर झालेल्या त्रुटी, सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या नियोजनातून जिल्ह्यात मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले, अशी आशा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या, तर शहरात काही मतदारसंघात रांगा दिसून आल्या.

खडकवासला मदारसंघातील वडगाव बु. मधील सनसिटी कम्युनिटी हॉल येथे तयार करण्यात आलेले आदर्श मतदान केंद्रात मतदान झाले होते. त्यानुसार ३ ते ५ या काळात १२.३९ टक्के वाढ झाली होती. सायंकाळी पाच ते सहा दरम्यान ७ टक्के मतदान वाढले. ग्रामीण भागातील बहुतांश जिल्ह्यात सर्वाधिक मतदान इंदापूर मतदारसंघात ७६,१० टक्के; तर सर्वात कमी मतदान हडपसर मतदारसंघात ५०.११ टक्के नोंदविण्यात आले. सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये शहरी भागात उत्साह दिसला. मात्र, ग्रामीण भागात मतदार मतदानासाठी फारसे बाहेर पडले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून आला. तर अपेक्षेनुसार शहरी भागात दुपारी मतदान कमी झाल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात केवळ ५.५३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर ११ वाजेपर्यंत अर्थात पहिल्या चार तासांमध्ये जिल्ह्यात १०,११ टक्के मतदान वाढून एकूण मतदान १५.६४ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नंतरच्या दोन तासांत अर्थात दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात २९.०३ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात ११ ते १ या वेळेत यात १३.३९ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४१.७० टक्के मतदान झाले होते. १ ते ३ या दोन तासांमध्ये जिल्ह्यात १२.६७ टक्के वाढ दिसून आली आहे. दुपारी पाचपर्यंत जिल्ह्यात ५४.०९ टक्के

मतदारसंघांमध्ये मतदारांच्या सायंकाळी ६ नंतरही रांगा लागल्याचे दिसून आले. सहानंतर शहरातील हडपसर, पर्वती, खडकवासला आदी मतदारसंघांमध्ये रांगा लागलेल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व मतदारसंघातील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे पूर्णवेळ तळ ठोकून होते. सहा वाजल्यानंतर ज्या मतदारसंघातील मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या, अशा मतदान केंद्रांची माहिती घेऊन संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदानाबाबत निर्देश देत होते. सर्व मतदारांना केंद्रात घेऊन सर्वांना चिठ्ठयांचे वाटप करा, पोलिसांना याबाबत निर्देश द्या, गोंधळ होणार नाही असे नियोजन करून मतदान शांततेत पार पडेल, अशा सूचना दिवसे यांनी यावेळी दिल्या.

वाढला होता. शहरातील, तसेच ग्रामीण भागातील शिरूर व बारामती मतदारसंघातील काही मतदान केंद्रे व अन्य मतदारसंघामध्ये रात्री साडेसातपर्यंत मतदान संपले होते. शिरूर व बारामतीमधील काही केंद्रांवर रात्री नऊपर्यंत मतदान सुरू होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

सुरुवातीच्या दोन तासांच्या टप्प्यात ग्रामीण भागात मतदार मतदानासाठी फारसे बाहेर पडले नाहीत. मात्र, शहरात मतदान करण्यासाठी केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह वाढला. शहरी भागात मात्र, तो फारसा वाढला नाही. दुपारी ३ वाजेपर्यंत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले.

शहरी भागात १ वाजेनंतर मतदानाचा ओर आणखी ओसरला. तर ५ वाजेनंतर शहरासह ग्रामीण भागातही मतदानाचा जोर वाढला होता. जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या सर्वच सत्रांमध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. तर पिंपरी मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसल्याने तेथे सर्वात कमी मतदान झाले आहे. सुरुवातीच्या दोन तासांच्या टप्प्यात ग्रामीण भागात मतदार मतदानासाठी फारसे बाहेर पडले नाहीत. मात्र, शहरात मतदान करण्यासाठी केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह वाढला. शहरी भागात मात्र तो फारसा वाढला नाही. दुपारी तीनपर्यंत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले, शहरी भागात एक वाजेनंतर मतदानाचा जोर आणखी ओसरला. शहरासह ग्रामीण भागातही पाचनंतर मतदानाचा जोर

मतदार यादीतील त्रुटी दूर झाल्यानंतर मतदारांच्या तक्रारी कमी आल्या. जिल्ह्यात ६६७ मतदान केंद्रांच्या जागा बदलण्यात आल्या, तर २२७ नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. किरकोळ अपवाद वगळता मतदारांच्या तक्रारी आल्या नसल्याचे दिवसे म्हणाले. मतदान केंद्रांमध्ये एकाच वेळी चार मतदार सोडल्याने मतदानास वेळ कमी लागला. त्यामुळे शहरात, तसेच ग्रामीण भागात रांगेमध्ये उभे राहण्याचा वेळ कमी झाला. त्यामुळे मतदारांचा ओघ वाढला असेही ते म्हणाले. मतदार चिठ्ठयांचे वाटपही मोठ्या प्रमाणात झाल्याने मतदान केंद्राची माहिती मिळाली. त्यामुळे मतदार आपापल्या केंद्रावर पोहोचले. त्याचाही परिणाम मतदानावर झाला आणि टक्केवारी वाढल्याचे ते म्हणाले. मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या तक्रारी केवळ दोन ते तीन ठिकाणांहून आल्याचे सांगत त्यात पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रांवर मोबाइलला बंदी घालण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीवेळी याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. मात्र, या वेळेस मतदारांना याची कल्पना असल्याने तक्रारी आल्या नाहीत, असेही ते म्हणाले, केवळ २ ते ३ ठिकाणी एका मतदाराच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याच्या तक्रारी आल्या. मात्र, अशा मतदारांनी टेंडर वोटिंग केले नसल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात साडेआठ हजार मतदान केंद्रे होती. मात्र, मतदान यंत्रांच्या प्रथम स्तर तपासणीदरम्यान त्रुटी दूर केल्याने मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना फारशा घडल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कॅन्टोन्मेंटमध्ये सहाला मतदान झाले बंद

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ६ वाजता सर्व मतदान केंद्रांवर मतदान थांबले होते. हा मतदारसंघ जिल्ह्यात कसबा पेठ मतदारसंघानंतर सर्वात लहान असल्याने मतदारांची संख्याही कमी आहे. तसेच हा मतदारसंघ शहरी असल्याने दिवसभर मतदारांचा ओघ कायम होता. अखरेच्या टप्प्यात या मतदारसंघात रांगा तसेच मतदारही दिसून आले नाही. त्यामुळेच येथील मतदान सहाच्या ठोक्याला बंद झाले.

कसब्यानंतर खडकवासल्यात सर्वाधिक मतदान

शहरातील सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ मतदारसंघात ५८.७६ टक्के मतदान झाले आहे. त्याचा फायदा कोणाला होणार हे आता प्रत्यक्ष मतमोजणी दिवशीच स्पष्ट होणार आहे, तर शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला मतदारसंघात ५६.५३ टक्के मतदान झाले. 

जिल्ह्यातील मतदान शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय जिल्हा प्रशासन, पोलिस, तसेच सर्व अंमलबजावणी यंत्रणा यांना द्यावे लागेल. शहरी मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती, तसेच मतदार यादीचे शुद्धीकरण कारणीभूत आहे.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी 

Web Title: Pune Vidhan Sabha 2024 The highest voter turnout of 76.10 percent was in Indapur constituency; while the lowest was 50.11 percent in Hadapsar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.