Pune Vidhan Sabha 2024 : टक्का वाढला तरी जिल्ह्यात सर्वात कमी मतदान, हडपसर बदलाचा कित्ता गिरवणार की इतिहास घडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:04 PM2024-11-22T13:04:50+5:302024-11-22T13:04:50+5:30

मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.

Pune Vidhan Sabha 2024 Will the alliance or Aghadi suffer the most loss due to low voter turnout? | Pune Vidhan Sabha 2024 : टक्का वाढला तरी जिल्ह्यात सर्वात कमी मतदान, हडपसर बदलाचा कित्ता गिरवणार की इतिहास घडवणार?

Pune Vidhan Sabha 2024 : टक्का वाढला तरी जिल्ह्यात सर्वात कमी मतदान, हडपसर बदलाचा कित्ता गिरवणार की इतिहास घडवणार?

पुणे : विधानसभा निवडणुकीत शहरातील आठ मतदारसंघापैकी सर्वांत कमी म्हणजे ५०.११ टक्के मतदान हडपसर मतदारसंघात झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का अवघा २.८६ टक्के वाढला आहे. त्या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे चेतन तुपे आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, मनसेचे साईनाथ बाबर, अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यात लढत झाली आहे. हडपसर मतदारसंघात मध्यमवर्गींयासह 'हाय प्रोफाइल' सोसायट्या आणि झोपडपट्टी भागाचाही समावेश आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या रामटेकडी, वैदुवाडी, साठेनगर हा झोपडपट्टी बहुल प्रभाग या मतदारसंघात येतो. पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वाधिक मतदार हडपसर मतदारसंघात आहे. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार ६७५ मतदार आहेत. त्यात पुरुषाची ३ लाख २८ हजार, तर महिला २ लाख ९७ हजार ५१५ इतकी आहेत. यंदा या मतदानात २.८६ टक्के वाढ होऊन मतदानाची टक्केवारी ५०.११ टक्के झाली आहे. या मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत ४७.२३ टक्के मतदान झाले होते. पुणे शहरातील आठ मतदारसंघामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये सर्वाधिक कमी मतदान झाले आहे. या मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.

हडपसरमध्ये बदल होणार का इतिहास घडणार ?

हडपसर मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर या मतदारसंघात आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करीत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल पाहावयास मिळाला आहे. पण, यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाली आहे. त्यामुळे तुपे दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास घडणार की हडपसरमध्ये बदल होणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

Web Title: Pune Vidhan Sabha 2024 Will the alliance or Aghadi suffer the most loss due to low voter turnout?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.