Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
By नितीन चौधरी | Published: November 20, 2024 10:51 AM2024-11-20T10:51:39+5:302024-11-20T10:52:14+5:30
कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७.४४ टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात ४.०४ टक्के झाले
पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ५.५३ टक्के मतदान झाले आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७.४४ टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात ४.०४ टक्के झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात येथे जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. शहरी भागातील ६ हजार ५०० तर ग्रामीण भागातील १ हजार ८०० मतदान केंद्रावर १३ हजर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान टक्क्यांत
जुन्नर : ५.२९
आंबेगाव : ५.७९
खेड आळंदी ४.७१
शिरूर ४.२७
दौंड ५.८१
इंदापूर ५.५
बारामती ६.२०
पुरंदर ४.२८
भोर ४.५०
मावळ ६.०७
चिंचवड ६.८०
पिंपरी ४.०४
भोसरी ६.२१
वडगाव शेरी ६.३७
शिवाजीनगर ५.२९
पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३
पर्वती ६.३०
कोथरूड ६.५०
खडकवासला ५.४४
कसबा ७.४४
हडपसर ४.४५
एकूण ५.५३