घरच्या मैदानात पुण्याची फटकेबाजी, कोलकात्यासमोर 183 धावांचे आव्हान
By admin | Published: April 26, 2017 09:41 PM2017-04-26T21:41:31+5:302017-04-26T21:41:31+5:30
अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठीने दिलेली दमदार सलामी, त्यानंतर महेंद्रसिंग धोनी व कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी केलेली फटकेबाजी यांच्या जोरावर पुणे सुपरजायंट्सने घरच्या मैदानावर
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 26 - अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठीने दिलेली दमदार सलामी, त्यानंतर महेंद्रसिंग धोनी व कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी केलेली फटकेबाजी यांच्या जोरावर पुणे सुपरजायंट्सने घरच्या मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत कोलकाता नाइटरायडर्ससमोर 182 धावांचे आव्हान ठेवले.
कोलकाता नाइटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर राहुल त्रिपाठी आणि अजिंक्य रहाणे यांनी पुण्याला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही संघाला 65 धावांची सलामी दिली. दरम्यान त्रिपाठी (38) फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर रहाणे (46), स्टीव्हन स्मिथ (नाबाद 51), महेंद्रसिंग धोनी (23) आणि डॅन ख्रिस्टियान (16) यांनी जोरदार फटकेबाजी करत पुण्याला 20 षटकांमध्ये 5 बाद 182 अशी दणदणीत धावसंख्या उभारून दिली. कोलकात्याकडून कुलदीप यादवने 2 तर उमेश यादव, सुनील नारायण आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.