Pune Water Cut Update: औंध, पाषाण, बाणेर परिसरात बुधवारी पाणी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 10:00 IST2023-01-02T09:56:20+5:302023-01-02T10:00:02+5:30
कोणत्या परिसरातील पाणीपुरवठा बंद असणार?...

Pune Water Cut Update: औंध, पाषाण, बाणेर परिसरात बुधवारी पाणी बंद
पुणे : चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागांतर्गत चतु:शृंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (दि. ४) करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी औंध, बाणेरसह इतर काही भागाचा पाणीपुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ५) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणाचा काही भाग, चव्हाणनगर, पोलिस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसलेनगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी, इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत इत्यादी. या सर्व भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.