Pune Water Cut | पुणे शहरात 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:36 AM2023-02-28T10:36:40+5:302023-02-28T10:38:07+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
पुणे : शहरातील रामटेकडी ते खराडी भागातील जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याच्या कामासाठी गुरुवारी (दि. २ मार्च) या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
इथे असेल पाणी बंद
ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, भारत फोर्स कंपनी एरिया, महंमदवाडी, हांडेवाडी रोड, गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा सिटी, मुंढवा गाव, केशवनगर, भीमनगर, शिंदे वस्ती, शिर्के कंपनी, काळेपडळ, गाडीतळ, वैदूवाडी हडपसर, हेवन पार्क, भारत फोर्स कंपनी एरिया.