Pune Water Supply : संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार
By राजू हिंगे | Updated: December 9, 2024 19:27 IST2024-12-09T19:27:45+5:302024-12-09T19:27:45+5:30
शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

Pune Water Supply : संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामे येत्या १२ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल. आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब वारजे जलकेंद्र लगत खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर तसेच कोंढवे – धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
त्यामुळे संपूर्ण शहराचा गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.